Kishor Tiwari | आर्यन खान निर्दोष आहे : किशोर तिवारी
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळावा, यासाठी शाहरुखकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावर शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळावा, यासाठी शाहरुखकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावर शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्यन खान निर्दोष आहे, असे वक्तव्य तिवारी यांनी केलं आहे. 20 ऑक्टोबर रोजी स्टारकिडच्या जामिनावर पुन्हा सुनावणी होईल. गेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. आता आर्यन खानच्या भवितव्याचा निर्णय 20 तारखेला होणार आहे. प्रत्येकजण न्यायाधीशांच्या निकालाची वाट पाहत आहे. दरम्यान, ड्रग्ज सारख्या संवेदनशील विषयावर आर्यन खानची पाठराखण लाजिरवाणी असल्याचे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,

