Ashadhi Ekadashi | भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली, पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह

आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्रासाठी एक सणच मानला जातो. लाखो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होतात.

मोठ्या थाटामाटात जल्लोषात साजरी केल्या जाणाऱ्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, या अभंगाप्रमाणे पंढरपुरातील विठूरायाचे रुप आज खुलून निघालं आहे. आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्रासाठी एक सणच मानला जातो. लाखो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होतात. आषाढीला ‘देवशयनी एकादशी’ असं ही म्हणतात. आषाढ महिन्यात उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरु होतं. या काळात असूर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देतात. असूर शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी देवांची पूजा केली जाते. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी पर्वणी असते. या सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI