Pandhapur Wari | प्रत्येक पालखीसोबत 30 वारकऱ्यांना परवानगी, पोलीस प्रशासनानं दिली परवानगी

आज पंढरपूर जवळ असलेल्या वाखरी इथं मानाच्या 10 पालख्यांचं आगमन झालं आहे. अशावेळी आता पंढरपूरमध्ये प्रवेश करताना एकूण 300 अर्थात प्रत्येक पालखीसोबत फक्त 30 वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त उद्या पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे. तत्त्पूर्वी आज पंढरपूर जवळ असलेल्या वाखरी इथं मानाच्या 10 पालख्यांचं आगमन झालं आहे. अशावेळी आता पंढरपूरमध्ये प्रवेश करताना एकूण 300 अर्थात प्रत्येक पालखीसोबत फक्त 30 वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विसाव्यापर्यंत या पालख्या बसने जातील आणि त्यानंतर सर्व वारकरी पायी जाणार असल्याची माहिती दिलीय. वारकरी आणि प्रशासना यांच्यात बैठक पार पडली. त्यानंतर पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI