Ashish Shelar | 27 टक्के ओबीसी आरक्षणाचा राज्य सरकारच्या हेकेखोरीमुळे खून : आशिष शेलार
ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्ले सुरु झालेत. ‘ठाकरे सरकारने दृष्टीआहिन, बुध्दीाहिन आणि दिशाहिन भूमिकेने ओबींसींच्या राजकीय आरक्षणाचा खून केला’, असा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय.
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्ले सुरु झालेत. ‘ठाकरे सरकारने दृष्टीआहिन, बुध्दीाहिन आणि दिशाहिन भूमिकेने ओबींसींच्या राजकीय आरक्षणाचा खून केला’, असा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. तसंच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण जात असताना मंत्री म्हणून छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार मंत्रीमंडळात कसे राहू शकतात?, असा खोचक सवालही शेलार यांनी केलाय.
ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळे स्थाानिक स्वाराज्य संस्थांमधील ओबीसींच्या 27 टक्केच आरक्षणाचा खून झाला. ज्या पद्धतीने 2019ला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निवडा देताना ट्रिपल टेस्टमध्ये खरा ठरणारा इंपेरिकल डाटा गोळा करा, असा आदेश दिला होता. मात्र, अहंकार आणि हेकेखोरपणा या सरकारने सोडला नाही. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला सांगितले की, मागासवर्ग आयोग नेमा, इंपेरिकल डाटा गोळा करा, आरक्षणासाठी समथर्न कार्यपध्दीती करा. पण ठाकरे सरकारने काय केले तर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने द्यावा, जनगणननेची आकडेवारी केंद्र सरकारने द्यावी, साथीच्या काळात आम्हाला इंपेरिकल डाटा गोळा करणे शक्य नाही, असं वारंवार सांगत राहिले, अशी खोचक टीका शेलार यांनी केलीय.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

