Ashok Chavhan : अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीस यांची भेट, चव्हाण भाजपमध्ये येणार का?

चव्हाण व फडणवीस यांच्यात 15 ते 20 मिनीटं चर्चा झाल्याचंही कळतं. त्यामुळं अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का, अशी चर्चा आहे. येवढच नाही, तर काँग्रेसचा एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं.

गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 02, 2022 | 9:27 PM

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत उद्धव ठाकरे यांना जबर धक्का दिला. आता काँग्रेसमध्ये भूकंप येणार की, काय असं चित्र आहे. अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंनी तब्बल चाळीस आमदार फोडून राजकीय भूकंप घडविला. भाजपसोबत सत्ता स्थापित केली. आता काँग्रेसचे अशोक चव्हाणही मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपसमर्थक आशिष कुलकर्णींच्या घरी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती मिळते. चव्हाण व फडणवीस यांच्यात 15 ते 20 मिनीटं चर्चा झाल्याचंही कळतं. त्यामुळं अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का, अशी चर्चा आहे. येवढच नाही, तर काँग्रेसचा एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें