“अजित पवार यांना पुन्हा अर्थखाते, आता ‘त्या’40 आमदारांनी…”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा टोला
मविआ सरकारमध्ये असताना अजित पवार यांच्यावर निधी देत नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केला होता. पण, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा अजित पवारांकडे अर्थखाते आल्याने शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाली आहे. यावरून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टोलेबाजी केली आहे.
नांदेड : मविआ सरकारमध्ये असताना अजित पवार यांच्यावर निधी देत नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केला होता. पण, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा अजित पवारांकडे अर्थखाते आल्याने शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाली आहे. यावरून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टोलेबाजी केली आहे. “अजित पवारांकडे असलेल्या अर्थखात्यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याचं शिंदे गटातील आमदारांनी सांगितलं होतं. त्यामुळे आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले होते. जे आमदार अजित पवार यांच्यामुळे सोडून गेले. तेच अजित पवार आता पुन्हा अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्यास हरकत नाही. राजकारण आयपीएल सामन्यासारखं झालं आहे,” असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

