Nanded Hadgaon: नांदेडच्या हदगावात विकासकामांचे वाजले 12! अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात कोण मारणार बाजी? पब्लिक क्या बोलती?
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात विकासकामांची दुर्दशा, खराब रस्ते, गटार आणि शौचालयाचा अभाव यावर जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी पूरग्रस्त असूनही मदतीपासून वंचित आहेत, तर महागाईने नागरिक त्रस्त आहेत. स्थानिक राजकारणावरही नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी हदगावमधील पायाभूत सुविधांची दुरवस्था आणि नागरिकांच्या समस्या प्रकर्षाने समोर आल्या. रस्त्यांची दुरवस्था, गटार आणि शौचालयासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात विकासाचा अभाव असल्याची तक्रार नागरिकांनी केली. स्थानिक नेते फक्त निवडणुकीच्या वेळी येतात आणि नंतर गायब होतात, असेही जनतेने सांगितले.
शेतकऱ्यांनी महागाई आणि पिकांच्या कमी भावाबाबत चिंता व्यक्त केली. पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतरही सरकारी मदत वेळेवर मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही शेतकऱ्यांना 32 कोटी रुपयांच्या निधीतून एक रुपयाही मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. अच्छे दिन आले नसल्याचे अनेक नागरिकांनी स्पष्ट केले, उलट महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर जनतेने संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. एकूणच, हदगावमध्ये बदलाची अपेक्षा असून नागरिक योग्य उमेदवाराच्या प्रतीक्षेत आहेत.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

