Ashok Kharat | केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए… चौकशीदरम्यान खरातची भलतीच डायलॉगबाजी अन्…
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे.
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. भोंदू खरातवर आत्तापर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. SIT अधिकारी त्याची कसून चौकशी करत आहेत. अलीकडील माहितीनुसार चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना अजब उत्तरं दिल्याचं सांगितलं जात आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार पोलिसांना जबाब देताना त्याने ‘दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए’ असं विधान केलं. खरातने चौकशीदरम्यान कबुल केलं की, त्याने चमत्कार करुन नाही तर हातचालाखीनं महिलांना धमकावलं आणि शोषण केलं. भोंदू खरातला त्याच्या कुकर्मांचा जराही पश्चाताप नाही, उलट त्याने लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करुन आणि विज्ञानाच्या ट्रिक्स वापरून गुन्हा केल्याचंही पोलिसांना सांगितलं. पोलिसांचे विशेष पथक खरात प्रकरणी आणखी तपास करत असून येत्या काळात बरीच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 07, 2026 12:36 PM
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब

