Ashok Kharat Case Update | भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन दिवसांची मागणी होणार?
गेल्या 15 दिवसांच्या तपासात भोंदूबाबा अशोक खरातबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज अशोक खरातला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तपास अधिकारीही कोर्टात उपस्थित राहणार असून, कोर्ट परिसरात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अशोक खरातची सध्या चालू असलेली 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे.
गेल्या 15 दिवसांच्या तपासात भोंदूबाबा अशोक खरातबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज अशोक खरातला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तपास अधिकारीही कोर्टात उपस्थित राहणार असून, कोर्ट परिसरात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अशोक खरातची सध्या चालू असलेली 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. दरम्यान, त्याच्यावर नवनवीन कारवाया होत आहेत आणि आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी 9 गुन्हे लैंगिक अत्याचाराचे असून, 2 गुन्हे फसवणुकीसंदर्भातील आहेत. कोर्टात हजर झाल्यानंतर SIT कडून दोन दिवसांची पोलीस कोठडी पुन्हा मागितली जाऊ शकते, असे अनुमान आहे. आजच्या सुनावणीत SIT काय आणि कशा प्रकारचा युक्तिवाद मांडणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तपास अधिकारी किरण सूर्यवंशीही कोर्टात उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत मोठ्या कागदपत्रांचा गठ्ठा असलेली फाईल आहे. या फाईलमध्ये कोणत्या पुराव्यांचा समावेश आहे आणि कोर्टात कोणती माहिती सादर केली जाणार आहे, हे पाहणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.
Published on: Mar 29, 2026 12:28 PM
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही

