Assembly Session | सिंधुदुर्गमध्ये झालेल्या संतोष परब हल्ल्याप्रकरणी विधानसभेत पडसाद

सुनील प्रभू यांनीही नितेश राणे प्रकरणावरून विरोधकांवर हल्ला चढवला. त्या दिवशी मी हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हाही चर्चा झाली. तेव्हाही ठरलं नेत्यांबाबत नीट‌ बोललं पाहिजे. चुकीला माफी नाही. त्यामुळे नितेश राणेंना निलंबित केलंच पाहिजे, अशी आक्रमक मागणी प्रभू यांनी केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Dec 27, 2021 | 3:42 PM

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात येत असताना नितेश राणेंनी म्याव म्यावचा आवाज काढला होता. त्याचे आजही सभागृहात पडसाद उमटले. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज सभागृहात पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे नितेश राणे प्रकरणाकडे लक्ष वेधलं. आमच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंचा आम्ही आदर करतो. सुधीर भाऊ आपण फार बोलतात. मात्र, आपलसुद्धा ऐकलं जात नाही. अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करतो की सभागृहात किंवा सभागृहाच्या प्रांगणात आमच्या नेत्याविरोधात बोललं गेल्यास आम्ही शांत राहणार नाही. आमच्या नेत्याचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सुहास कांदे यांनी दिला. तसेच नितेश राणेंना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.

यावेळी सुनील प्रभू यांनीही नितेश राणे प्रकरणावरून विरोधकांवर हल्ला चढवला. त्या दिवशी मी हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हाही चर्चा झाली. तेव्हाही ठरलं नेत्यांबाबत नीट‌ बोललं पाहिजे. चुकीला माफी नाही. त्यामुळे नितेश राणेंना निलंबित केलंच पाहिजे, अशी आक्रमक मागणी प्रभू यांनी केली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें