हाऊस फुल्ल गर्दीचा शेवटचा दिवस; थेयटर बाहेर नव्हे तर मटण,चिकन दुकानाबाहेर तोबा गर्दी
अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना आणि नंतर श्रावण महिना लागणार आहे. त्यामुळे अनेकांना आता मांसाहार करता येणार नाही.
पुणे\औरंगाबाद | 16 जुलै 2013 : आज रविवार आणि उद्या सोमवार असून त्यानंतर मंगळवार पासून अधिक महिना सुरू होईल. अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना आणि नंतर श्रावण महिना लागणार आहे. त्यामुळे अनेकांना आता मांसाहार करता येणार नाही. त्यामुळे आज सकाळपासून नागरिकांनी मटण, चिकन घेण्यासाठी औरंगाबादसह पुणे शहरात विविध ठिकाणी मटण, चिकन दुकानाबाहेर गर्दी केली आहे. तर अनेक ठिकाणी मटण, चिकन दुकानाबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगाच रांगा पाहायला मिळत होत्या. यावेळी गटारी रविवारी आल्याने गटारी जोरदार साजरी केली जाणार आहे. श्रावणात अनेक जण मांसाहार टाळत असतात. त्यामुळं गटारी असल्याने मटण, चिकन दुकानावर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मटण, चिकन व्यवसायिकांचा धंदाही आज तेजीत पहायला मिळत आहे.

