AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sindhudurg |Kudalमध्ये भरवस्तीत आढळला गवा; परिसरात भीतीचे वातावरण

Sindhudurg |Kudalमध्ये भरवस्तीत आढळला गवा; परिसरात भीतीचे वातावरण

Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 07, 2022 | 4:47 PM
Share

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुडाळ (Kudal) तालुक्यातील अणाव गावात भरवस्तीत गवारेडा (Gaur) दिसून आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काल हा महाकाय गवा अणावमधील बामनवाडीत ठिकठिकाणी सैर करताना नजरेस पडत होता.

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुडाळ (Kudal) तालुक्यातील अणाव गावात भरवस्तीत गवारेडा (Gaur) दिसून आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काल हा महाकाय गवा अणावमधील बामनवाडीत ठिकठिकाणी सैर करताना नजरेस पडत होता. याआधीही तीनवेळा या गावात गव्याचे दर्शन झाले आहे. भरवस्तीत अगदी घराशेजारी गवा राजरोस  फिरत असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तत्काळ कारवाई करून ग्रामस्थांना भयमुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. याचा व्हिडिओ ग्रामस्थांनी काढला. मोबाइलमध्ये कैद हा गवा आता व्हायरल झालाय. व्हिडिओत तो अत्यंत आक्रमक आणि महाकाय असल्याचे दिसते. त्यामुळे गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर तत्काळ उपाययोजना करावी, अन्यथा गवा कोणावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Published on: Feb 07, 2022 04:46 PM
Follow Us