Saif Ali Khan Attack : 'सैफच्या अंगावर चाकूचे वार अन् रक्तबंबाळ', लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं मध्यरात्री नेमकं काय झालं?

Saif Ali Khan Attack : ‘सैफच्या अंगावर चाकूचे वार अन् रक्तबंबाळ’, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं मध्यरात्री नेमकं काय झालं?

| Updated on: Jan 17, 2025 | 9:04 PM

लिलावती रूग्णालयात नेण्यासाठी ज्या रिक्षातून सैफला नेण्यात आलं तोच रिक्षा चालक आता समोर आला आहे. रिक्षा चालक भजनलाल यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याची माहिती त्याच्याकडून देण्यात आली.

अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरूवारी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने चाकूने सहा वार केले. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने मुंबईच्या लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र लिलावती रूग्णालयात नेण्यासाठी ज्या रिक्षातून सैफला नेण्यात आलं तोच रिक्षा चालक आता समोर आला आहे. रिक्षा चालक भजनलाल यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याची माहिती त्याच्याकडून देण्यात आली. ‘एक व्यक्ती गेटमधून बाहेर आला, त्याच्यासोबत एक मुलगा देखील होता. त्याने पांढऱ्या कलरचा ड्रेस घातलेला होता. त्याचा शर्ट पूर्णपणे रक्तानं भरलेला होता. मला लिलावती रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मी पाच ते सहा मिनिटांमध्ये रिक्षा घेऊन लिलावती रुग्णालयात पोहोचलो. परंतु तोपर्यंत मला माहिती नव्हते की तो सैफ अली खान आहे. जेव्हा माझी रिक्षा रुग्णालयाबाहेर पोहोचली तेव्हा तो खाली उतरला आणि जोरात ओरडला ‘मै सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाओ’ तेव्हा मला कळालं की आपल्या रिक्षामध्ये सैफ अली खान बसला होता.’, असं त्या भजनलालने सांगितले. पुढे नेमका तो काय म्हणाला बघा व्हिडीओ…

Published on: Jan 17, 2025 09:00 PM