Bhushan Gavai Attack : सर्वोच्च न्यायालयात असं काय घडलं की, सुनावणी सुरू अन् वकिलानंच सरन्यायाधीशांना बूट फेकून मारला!

Bhushan Gavai Attack : सर्वोच्च न्यायालयात असं काय घडलं की, सुनावणी सुरू अन् वकिलानंच सरन्यायाधीशांना बूट फेकून मारला!

| Updated on: Oct 06, 2025 | 10:30 PM

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. विष्णु मंदिराच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावर संतप्त होऊन वकिलाने हे कृत्य केले. सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. मात्र, सरन्यायाधीशांनी कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देत कामकाज सुरू ठेवले

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सुनावणी सुरू असताना एका वकिलाने त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ कार्यवाही करत त्या वकिलाला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, हा वकील हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा देत होता.

एका विष्णु मंदिराशी संबंधित सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी तुमच्या तक्रारीसाठी भगवान विष्णूकडे जा असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप नोंदवला होता, आणि याच वक्तव्यामुळे संतापलेल्या वकिलाने हे कृत्य केले. या घटनेनंतर सरन्यायाधीश भूषण गवईंनी वकिलावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले. त्यांनी कोर्टात स्पष्ट केले की, तुम्ही विचलित होऊ नका, मला फरक पडत नाही. या प्रकारानंतरही सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज थांबवण्यात आले नाही, ते पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्यात आले.

Published on: Oct 06, 2025 10:30 PM