Atul Bhatkhalkar | संजय राऊतांचा मेंदू तपासण्याची देखील परिस्थिती नाही आहे : अतुल भातखळकर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय. यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते आज सिल्वासामध्ये बोलत होते. दरम्यान, संजय राऊतांचा मेंदू तपासण्याची देखील परिस्थिती नाही आहे, असा पलटवार भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

‘काल मी पाहिले महाराष्ट्र भाजपचे एक नेते शरद पवारांचा उल्लेख अरे-तुरे, एकेरी भाषेत करीत होते ही राज्याची परंपरा नाही आम्ही मोदी साहेबांचा उल्लेख किंवा अमित शाह यांच्याविषयी कधी असे बोलत नाही. अटलजी आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत. आडवाणी यांना आजही मानतो. आपल्यापेक्षा वय, अनुभव आणि विचारांनी मोठे असलेल्यांचा कायम आदर करावा. विचारांची लढाई विचारांनी करावी आणि पराभव करावा हे आम्हाला महाराष्ट्राने शिकवले…तुम्ही काल राजकारणात आलेली लोक शरद पवार यांचा उल्लेख एकेरी करता म्हणून मी म्हणतो यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणे गरजेचे…मेडिकल आणि नार्को पद्धतीने सुद्धा!’, अशी खोचक टीका राऊत यांनी केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI