सरकारी कंत्राटदार आत्महत्या प्रकरण; शरद पवार गटाचे प्रवक्ते आणि अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल
शरद पवार गटाचे प्रवक्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या सांभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
शरद पवार गटाचे प्रवक्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या सांभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. जल जीवन मिशनच्या कामाचे पैसे मिळालेले नाही, असा उल्लेख यात करण्यात आलेला आहे. तर 2024 पासून जल जीवन मिशनच्या कामाचे पैसे आलेले नाही असं अधिकाऱ्याचं म्हणण आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याने प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यानंतर आता ही ऑडिओ क्लिप समोर आलेली असल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी सांगली जिल्ह्यातील जलजीवन मिशन च्या अधिकाऱ्याला फोन लावून थकीत बिलांच्या संदर्भातील सत्यात समोर आणली आहे. या फोन कॉलमध्ये जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी २०२४ पासून जलजीवन मिशन च्या कामांचे पैसे आले नाहीत अशी कबुली दिली आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा त्यांच्या खात्यातील थकीत कंत्राटी बिलांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होत अशी माहिती या ऑडिओ कॉलमध्ये दिली आहे. दरम्यान, टीव्ही9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

