Aurangabad | औरंगाबादमध्ये पुन्हा लसींचा तुटवडा, लसीअभावी 69 लसीकरण केंद्र बंद
आता पुन्हा एकदा औरंगाबाद शहरात लसीचा मोठा तुटवडा पाहायला मिळत आहे. कोरोना लसीअभावी औरंगाबाद शहरातील 69 लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे.
कोरोना लस घेण्यासाठी वाळूज एमआयडीसी परिसरातील लसीकरण केंद्रावर झालेली चेंगचेंगरीची घटना ताजी आहे. असं असताना आता पुन्हा एकदा औरंगाबाद शहरात लसीचा मोठा तुटवडा पाहायला मिळत आहे. कोरोना लसीअभावी औरंगाबाद शहरातील 69 लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. शहराला 6 हजार लस प्राप्त झाल्या आहे. मात्र, काही तासांमध्येच या लसी संपल्यामुळे आता नागरिकांना लसीकरण केंद्रावरुन रिकाम्या हाती परताव लागत आहे. (Aurangabad Corona Vaccine Shortage at centers 69 vaccination centers closed)
Published on: Jul 12, 2021 10:19 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

