Aurangabad Waterfall | औरंगाबादच्या अजिंठा लेणीतील वाघूर धबधबा प्रवाहित, पाहा मनमोहक दृश्य

अजिंठा लेणी परिसरात पाहायला मिळतय. अजिंठा लेण्या या वाघूर नदीच्या बाजूला तयार करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना वाघूर धबधबा सातत्यानं खुणावत असतोय.

औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यातील वाघूर धबधबा ओसांडून वाहत असतोय. पाऊस म्हणजे चैतन्याची सळसळ असतेय. ही सळसळ अजिंठा लेणी परिसरात पाहायला मिळतय. अजिंठा लेण्या या वाघूर नदीच्या बाजूला तयार करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना वाघूर धबधबा सातत्यानं खुणावत असतोय. अजिंठा लेणीच्या शेजारचा वाघूर धबधबा ओसांडून वाहत आहे. वाघूर नदीवरील सातकूंड धबधबा हा जगामध्ये आगळावेगळा आहे. अजिंठा लेण्यांजवळच हा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतोय. औरंगाबादच्या जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यानं मराठवाड्यातील 400 गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे. मराठवाड्यातील शेतीसाठी  आणि नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI