Avinash Jadhav : हे आंदोलन व्यापाऱ्यांचं नाही, भाजपचं..; मनसेच्या अविनाश जाधवांची मोठी प्रतिक्रिया
Avinash Jadhav News : मीरा भाईंदरमधील मोर्चा हा व्यापारी संघटनांचा नसून भाजपचा असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
मीरा भाईंदरमधील मोर्चा हा व्यापारी संघटनांचा नसून भाजपचा आहे, असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. महाराष्ट्राची भाषा कोणती हे त्या माणसाला माहिती नव्हतं का? असा उपरोधक सवाल देखील यावेळी जाधव यांनी उपस्थित केला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदरमध्ये एका अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केली होती. मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर मनसेने ही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आज व्यापरी संघटनांकडून बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली. त्याचबरोबर मनसेच्या या भूमिकेविरोधात मोर्चा काढत व्यापाऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे.
यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया देत म्हंटलं की, हे आंदोलन भारतीय जनता पक्षाचं आहे. व्यापाऱ्यांना त्यांनी काल फोन केले होते. हे सगळं करण्यात तिथल्या आमदाराचा मोठा हात आहे. मराठी माणसाच्या विरोधात सतत हे लोक अशीच भूमिका घेत असतात, असं म्हणत सोशल मिडियावर अर्धवट व्हिडीओ व्हायरल करून अर्धवट माहिती सांगितली जात असल्याचं देखील अविनाश जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

राड्यानंतर राहुल नर्वेकरांचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर

ना हनी, ना ट्रॅप..; हनीट्रॅपवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?

बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप
