AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : मनसे नेते अविनाश जाधव याच्यासह १२ मनसैनिकांना अटक, मनसे आक्रमक

मोठी बातमी : मनसे नेते अविनाश जाधव याच्यासह १२ मनसैनिकांना अटक, मनसे आक्रमक

| Updated on: Oct 10, 2023 | 12:51 AM
Share

मनसे कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर मुलुंडमधील नवघर पोलीस स्टेशन येथे मनसे पदाधिकाऱ्यांनी भेट देण्यास सुरुवात केलीय. मनसे नेते संदीप देशपांडे हे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले. तर, अभिजीत पानसे, रिटाताई गुप्ता, बाळा नांदगावकर यांनी पोलीस ठाण्यात भेट दिलीय.

मुलुंड : 9 ऑक्टोबर 2023 | ठाणे टोलनाका येथे आंदोलन करणारे मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह १२ मनसैनिकांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. आयपीसी कलम १४१,१४२,१४३,१४५,१८६,१०७ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) कलमांतर्गत नवघर पोलिसांनी केली अटक आहे. तर, मुलुंड टोल नाका पेटविणाऱ्या रोशन वाडकर याला आयपीसी कलम ४३६ आणि डेमेज पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट कलम ३,४ कलमांतर्गत अटक करण्यात आलीय. मनसे कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर मुलुंडमधील नवघर पोलीस स्टेशन येथे मनसे पदाधिकाऱ्यांनी भेट देण्यास सुरुवात केलीय. मनसे नेते संदीप देशपांडे हे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले. तर, अभिजीत पानसे, रिटाताई गुप्ता, बाळा नांदगावकर यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलिसांशी संवाद साधला. ही अटक बेकायदेशीर असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. मनसे पदाधिकाऱ्यांची सुटका होणार का? उद्या कोर्टात जामीन मिळणार का? याकडे त्यांनी लक्ष वेधले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचे काम पाहणारे मुंबई उच्च न्यायालयाचे वकील राजन शिरोडकर हे नवघर पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी दाखल झाले आहेत.

Published on: Oct 09, 2023 11:58 PM