Avinash Jadhav : आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी? मोर्चादरम्यान जे घडलं त्यावर अविनाश जाधव भडकले
प्रत्येक महाराष्ट्रातील घरा-घरात मनसेचं मराठी आंदोलन पोहोचलं आहे. यापुढे महाराष्ट्रात मराठी माणसासोबत काही चुकीचं घडलं तर असेच मोर्चे काढण्यात येतील, याची सरकारने दखल घ्यावी, असे म्हणत अविनाश जाधव यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे.
‘रात्री पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जितकं अवस्थ वाटत नव्हत त्यापेक्षा जास्त मोर्चाच्या ठिकाणी येताना वाटत होतं कारण मीरा-भाईंदरमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मराठी माणूस रस्त्यावर उतरला होता. ते पाहून माझ्याकडे शब्द नाहीत’, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी आल्यानंतर दिली. पुढे ते असेही म्हणाले, आज झालेल्या मोर्चात पोलीस प्रशासन आणि गृहखात्याचा दबाव होता. मराठीसाठी मोर्चा काढतोय. महाराष्ट्रात अधिवेशन चालू आहे, असं सांगत असतानाही पोलिसांनी मध्यरात्री माझ्या घरी येऊन मला ताब्यात घेतलं. यानंतर मराठी माणूस आक्रमक झाला. यानंतर महिला, कार्यकर्ते, मराठी माणसाला उचलून नेतायत. मला त्याचं कारण समजलं नाही, आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी? असा आक्रमक सवाल अविनाश जाधव यांनी यावेळी केला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

