बाळकूममधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
मनसेचे नेते अविनाश जाधव बाळकुममधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात आता आक्रमक झालेले आहेत.
बाळकुममधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव आता आक्रमक झालेले आहेत. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर देखील टीका केली आहे. आम्हाला एकीकडे अभिजात भाषेचा दर्जा देऊन दुसरीकडे आमच्या विरोधात कटकारस्थान करायचे, आमच्या तोंडाला पानं पुसायची, असं कशासाठी करत आहे सरकार? असा घणाघाती सवाल त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उपस्थित केला आहे. मराठी तुमची आई आहे म्हणतात मग तिचा रोज अपमान का करतात? आत्ताच्या परिस्थितीत शासनापेक्षा शाळा मोठ्या झाल्या सारखं वाटतं आहे, अशीही टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.
राज्याच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि हिन्दी भाषेच्या वादाला तोंड फुटलेलं असल्यानंतर आता नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच मनसेकडून हा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला गेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्ज देऊनही शाळांना मराठी भाषा सक्तीची का नाही? असा संतप्त सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून करण्यात आला आहे.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

