Avinash Jadhav : लोकल अपघात प्रकरणी मनसेचा आक्रमक पवित्रा
MNS Protest : मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज काढलेल्या धडक मोर्चानंतर ठाणे रेल्वे स्थानकात भेट देऊन रेल्वेच्या शिष्ठमंडळाला धारेवर धरलं.
एका महाराष्ट्र सैनिकाने या अपघाताबद्दल आधीच रेल्वे प्रशासनाला सूचना दिली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा दावा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. मुंब्रा येथील लोकल अपघात प्रकरणी आज संतप्त मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला. त्यानंतर जाधव यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देखील दिले. या वेळी स्टेशन मास्तर, आरपीएफ, जीआरपी यांचे अधिकारी देखील उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी अविनाश जाधव यांनी शिष्ठ मंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. अशी एखादी घटना घडल्याच्या नंतरच तुम्ही समोर येतात. नाहीतर तुम्ही कोणी सामोरही येत नाही. अजून किती लोक मरावी अशी तुमची अपेक्षा आहे? हे रेल्वेने आम्हाला कळवावं, अशा कडक शब्दांत जाधव यांनी रेल्वेच्या शिष्ठ मंडळाला खडसावलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

