MNS Protest : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेविरोधात मनसेचा धडक मोर्चा
Mumbra Local Accident : मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातानंतर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यानंतर आज मनसेने मोर्चा काढला आहे.
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आज मनसेकडून धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे. गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मोर्चामध्ये अविनाश जाधव यांच्यासह ठाणेकर आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत.
काल दिवा -मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान कसाराकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या एका लोकलाल अपघात झाला होता, यात अनेक प्रवासी जखमी झाले तर चौघांना आपला जीव गमवावा लागला, या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मनसेकडून हा धडक मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, या मोर्चामुळे परिसराला छावणीचं स्वरूप आलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

