Ayodhya : 11 किलो वजन, भगव्यावर सूर्य, ओम अन् अयोध्येचे राजवृक्ष… राम मंदिरावरील ध्वजाची खास वैशिष्ट्य, मोदींच्या हस्ते ध्वजारोहण
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य ध्वजारोहण होणार आहे. या विशेष क्षणासाठी आठ हजार पाहुण्यांना निमंत्रण आहे. भाजप घर-घर राम अभियान राबवत असून, मुख्यमंत्र्यांनी भगवा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अंबरनाथमधील मतदार यादीतील कथित घोळावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
अयोध्येतील भव्य राम मंदिराचे बांधकाम प्राणप्रतिष्ठेच्या एक वर्ष नऊ महिन्यांनंतर पूर्ण झाले आहे. या महत्त्वपूर्ण क्षणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरात ध्वजारोहण होणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह देशभरातील आठ हजार विशेष पाहुणे या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.
दुपारी १२ ते १२:३० या शुभ मुहूर्तावर हा ११ किलो वजनाचा भगवा ध्वज फडकवला जाईल. हा ध्वज पॅराशूट फॅब्रिकपासून बनवलेला असून, त्यावर सूर्य, ओम आणि अयोध्येचे राजवृक्ष असलेल्या कोविदार वृक्षाची चिन्हे आहेत. ४२ फूट उंचीच्या स्तंभावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंदीचा हा ध्वज फडकवला जाणार आहे. मंदिरावर ध्वज फडकवणे म्हणजे मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण झाल्याचे जगाला सांगणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. या निमित्ताने भाजपने घर-घर राम अभियान सुरू केले असून, मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचा उत्साह महाराष्ट्रातही दिसून येत आहे.
Published on: Nov 25, 2025 11:23 AM
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
