Bachchu Kadu : बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले
शेतकऱ्यांना पेरणीचे पैसे सरकार देत असल्याचं सांगत लोणीकरांनी एकप्रकारे उपकाराची भाषा केली आहे. मात्र या वादग्रस्त वक्तव्यानंतर बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत.
भाजपच्या बबनराव लोणीकरांवर बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोकायला पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले. वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड उठवली जात असताना बच्चू कडू देखील आक्रमक झाले आहेत. इतकंच नाहीतर शेतकऱ्यांना जिथे बबनराव लोणीकर दिसतील तिथे त्यांना ठोकायला हवं, असा घणाघातही बच्चू कडू यांनी केला आहे. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त केलेल्या वक्तव्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘लोणीकर ज्या पद्धतीने बोलताय आणि कृषीमंत्री देखील बोलताय त्यामुळे त्याला माफी मागून चालणार नाही. तर ठोकून पुरून उरलं पाहिजे. शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे.’, असं बच्चू कडू म्हणाले.
काय म्हणाले होते लोणीकर
कट्ट्यावर बसणाऱ्या तरुणाच्या आईचा पगार सरकराने दिलाय, तरुणाच्या वडिलांना पेन्शनही त्यांनीच दिली आहे, तरुणाच्या वडिलांना पेरणीसाठी 6000 रुपये पंतप्रधान मोदींनी दिले, तरुणाच्या बायकोला बहिणीला आणि आईला लाडक्या बहिणीचे पैसे दिलेत, तरुणाच्या अंगावरचे कपडे सरकारने दिले, तरुणाच्या पायातली चप्पल आणि बूटही सरकारमुळे आहे, तरुणाच्या हातातला मोबाईलही सरकारमुळे आहे.

बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप

मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण

आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे

हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
