Bachchu Kadu : …त्यांना संपवणं हाच भाजपचा अजेंडा, बच्चू कडू यांचा गंभीर आरोप; घराणेशाही अन् रणनीतीवरही प्रहार
बच्चू कडू यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर भाष्य करताना त्या धार्मिक आणि जातीय युद्धात बदलल्याचे म्हटले. त्यांनी भाजपवर मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांचा घात करण्याचा अजेंडा असल्याचा आरोप केला. राज्यात आर्थिक संकट दाखवून कल्याणकारी योजनांचे पैसे थांबवले जात असल्याचा दावा करत, भाजपच्या आर्थिक धोरणांवरही त्यांनी टीका केली.
राज्यात सुरू असलेल्या नगरपंचायत आणि नगराध्यक्ष निवडणुकांमध्ये प्रहार पक्षाने ठिकठिकाणी उमेदवार उभे केले आहेत, अशी माहिती स्वतः बच्चू कडू यांनी अमरावतीत टीव्ही नाईन मराठीशी बोलताना दिली. निवडणुकीचे स्वरूप आता मुद्द्यांवर आधारित राहिलेले नसून ते धार्मिक आणि जातीय युद्धात बदलले आहे, असेही त्यांनी आपले मत व्यक्त केले. तर बहुसंख्य मतदार पैशांवर किंवा सुविधांवर अवलंबून असल्याने प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
बच्चू कडू यांनी भाजपच्या राजकीय रणनीतीवर जोरदार हल्ला चढवला. “मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांचा घात करणे हा भाजपचा अजेंडा आहे,” असे ते म्हणाले. भाजप स्वतःच्या मित्रपक्षांना वामनावताराप्रमाणे संपवून त्यांच्या डोक्यावर पाय ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजप मित्रपक्षांचे खच्चीकरण करून मुंबई ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यांनी मित्रपक्षांना भाजपच्या खेळीविरोधात जागृत राहण्याचा सल्ला दिला.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

