“…म्हणून अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले”, बच्चू कडू यांनी सांगितलं कारण
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर प्रहार संघटनेचे प्रमुख, बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अमरावती: शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर प्रहार संघटनेचे प्रमुख, बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “देवेंद्र फडणीस यांच उत्तम नियोजन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विकास, यामुळे अजितदादा या सरकारच्या प्रेमात पडले होते. सत्तेपेक्षा विकास कसा करावा हे अजितदादांच्या आणि राष्ट्रवादीच्या लक्षात आलं. म्हणून ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. कालपर्यंत खोके म्हणणारे लोक आज ओके होऊन सरकारमध्ये आले. त्यांच आम्ही स्वागत करतो अभिनंदन करतो,” असं बच्चू कडू म्हणाले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

