AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bacchu Kadu | पुढच्या काळात गैरव्यवहार होणार नाही याची काळजी घेऊ : बच्चू कडू

| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 8:27 PM
Share

सहकार पॅनलला13 जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता अजून स्थापन व्हायची आहे.राजकारणात कधीही गुणाकार बेरीज होऊ शकते, असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेतील पुढील राजकारण कसे असेल याचे संकेत दिले आहेत.

अमरावती: अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल आज हाती आलेले आहेत. या निकालात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलने बाजी मारत 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवत बँकेत आपली सत्ता अबाधित ठेवलेली आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सातशे कोटी गुंतवणूक प्रकरणी सव्वातीन कोटी रुपयांची दलाली खाल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा प्रचार परिवर्तन पॅनलने सातत्याने केला होता. सहकार पॅनलला13 जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता अजून स्थापन व्हायची आहे.राजकारणात कधीही गुणाकार बेरीज होऊ शकते, असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेतील पुढील राजकारण कसे असेल याचे संकेत दिले आहेत. बँकेत पुढच्या काळात गैव्यवहार होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ, असे देखील राज्यमंत्री बचू कडू यांनी सांगितले.