देवेंद्र फडणवीस यांच्या त्या भूमिकेवरून बच्चू कडू कडाडले, म्हणाले ‘समर्थन करणार नाही पण…’
मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिणे सुरू करावे. जाळपोळ करणारी सत्ताधारीकडील लोक असेल तरी ते तपासले पाहिजे. जाळपोळ करणे चांगले नाही. त्यापासून दूर राहावे. असे कोणी करत असेल तर त्याला मराठा बांधवानी खेचून आणावे ही आपली प्रवृत्ती नाही असे बच्चू कडू म्हणाले.
मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : मराठा समाजाला ओबीसीमधून प्रमाणपत्र देत नसाल तर मराठा कोण आहे ते स्पष्ट करा. मराठा हा शेतीच करतो. व्यवसायिक नाही. मराठा हे सामूहिक नाव आहे. ते एका जातीचे नाही. यावर तातडीने तोडगा काढा अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केलीय. जाळपोळ करणाऱ्यांचा निषेध करतो. जाळपोळ करणे हे मराठ्यांचे लक्षण नाही. सरकारने गंभीरतेने समोर यावं अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होईल. आंदोलन दरम्यान जाळपोळ केली त्याचे समर्थन करणार नाही. रक्त सांडू नका, रक्त देणारी भूमिका बजावली पाहिजे असेही ते म्हणाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा वातावरणात कठोर भूमिका घेऊन चालणार नाही. कारवाई करा हे अधिकाऱ्यांनी म्हटले असते तर ठीक आहे. पण, गृहमंत्री असे म्हणत असतील तर लोकापर्यंत वाईट संदेश जातोय. विरोधी पक्ष गृहमंत्री यांचा राजीनामा मागत आहे. मात्र, आज महाराष्ट्र कोणत्या स्थितीत आहे याचे भान ठेवून राजकीय भाषण आणि राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले.
Published on: Nov 01, 2023 11:13 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
