बदलापुरात संतप्त नागरिकांचा रेलरोको, चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार, नामांकित शाळेत नेमकं काय घडलं?
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे बदलापुरात एकच संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय. नागरिक थेट रेल्वे रुळावर उतरले आहेत. यामुळे कर्जत-कल्याणदरम्यानची सेवा तासाभरापासून ठप्प झाली आहे.
अवघ्या साडेतीन वर्षांच्या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याकडून या दोघींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही धक्कादायक घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेनंतर आता बदलापुरातील नागरिक आणि पालक संतप्त झाले आहेत. इतकंच नाहीतर त्यांनी शाळेच्या आवारात एकत्र येत त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. या घटनेनंतर सध्या बदलापुरात नागरिक थेट रेल्वे रूळावर उतरले आहेत. या नागरिकांकडून रेलरोको आंदोलन करण्यात येत आहे. शाळेत जायला तयार नसल्याने चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता हा प्रकार समोर आला. यानंतर दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा नोंदवण्यासाठी 12 तास या मुलींच्या कुटुंबीयांना वाट पाहवी लागली. तर दुसरीकडे लघुशंकेसाठी मुलींना एकटं कसं सोडलं, सेविका सोबत का गेल्या नाहीत असा संतप्त सवाल पालकांकडून केला जात आहे.
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर

