tv9 Podcast | Crime Kisse | बॅडमिंटनपटू Syed Modi 26 व्या वर्षी हत्या, पत्नी-प्रियकर संशयित

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता, नॅशनल चॅम्पियन बॅडमिंटनपटू सय्यद मोदी (Syed Modi) याची वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. 28 जुलै 1988 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये सराव सत्रानंतर के. डी. सिंह बाबू स्टेडियममधून बाहेर पडताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता, नॅशनल चॅम्पियन बॅडमिंटनपटू सय्यद मोदी (Syed Modi) याची वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. 28 जुलै 1988 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये सराव सत्रानंतर के. डी. सिंह बाबू स्टेडियममधून बाहेर पडताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याची पत्नी अमिता सिंह आणि तिचा तत्कालीन प्रियकर (सध्या पती) संजय सिंह यांच्यावर हत्येचा आरोप झाला होता. मात्र नंतर दोघांचीही निर्दोष सुटका करण्यात आली होती.

1976 मध्ये फक्त 14 वर्षांचा असताना सय्यद मोदी ज्युनिअर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन बनला होता. त्यानंतर सय्यद सलग आठ वेळा राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन राहिला होता (1980-1987) आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सर्किटमध्ये त्याची सर्वात उल्लेखनीय कामगिरी 1982 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या रुपात समोर आली. त्याने ऑस्ट्रियन इंटरनॅशनल (1983 आणि 1984) आणि यूएसएसआर इंटरनॅशनल (1985) यासारखी इतर तीन आंतरराष्ट्रीय जेतेपदेही जिंकली होती, या दोन्ही युरोपियन बॅडमिंटन सर्किट स्पर्धा होत्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI