“विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाविरोधात काम करतात”, राम शिंदेंच्या आरोपावर थोरात म्हणतात…
बाजार समिती सभापती निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिला, असा गंभीर आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केला होता.याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदनगर : बाजार समिती सभापती निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिला, असा गंभीर आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केला होता.याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अहमदनगरमध्ये भाजपमध्ये अंतर्गत वाद”, असल्याचा दावा थोरात यांनी केला आहे. “राधाकृष्ण विखे हे ज्या पक्षात जातात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात असा आरोप राम शिंदे यांनी केला होता”, असं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले.”संपूर्ण जिल्ह्याला विखेंच राजकारण माहिती आहे. पण जर ते भाजपच्या विरोधात काम करत असतील तर आम्हाला मदत व्हायला हवी”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
