AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Press | निवडणुकीस वेळ आहे, थोडा वेळ थांबा... राऊतांचं सूचक विधान; सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मोठ्या घडामोडी?

Sanjay Raut Press | निवडणुकीस वेळ आहे, थोडा वेळ थांबा… राऊतांचं सूचक विधान; सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मोठ्या घडामोडी?

| Updated on: Apr 06, 2026 | 12:37 PM
Share

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसंबंधी राज्यातील राजकारण पुन्हा गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी आकस्मिक निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली. यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. यासाठी आज महायुतीकडून विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सत्ताधारी पक्षाकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, काँग्रेसने अ‍ॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्यामुळे आता महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले, “बारामती पोटनिवडणुकीबद्दल इतर पक्षांना प्रश्न का विचारत नाही? सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित पवारांच्या पत्नी आहेत. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज अर्ज भरणार आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.” संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या शुभेच्छा घेतल्या आहेत. तसेच हा निर्णय फक्त एका व्यक्तीचा नाही, तर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा आहे. काँग्रेसने उमेदवार उभा केला आहे, मात्र बारामती हा पवारांचा गड असल्याने निकाल सर्वांना माहिती आहे. राऊत म्हणाले की, “राजकारणात काही विषय सामोपचाराने हाताळले जातात. आज फक्त अर्ज भरण्याचा दिवस आहे, निवडणुकीस वेळ आहे, थोडा वेळ थांबा.”
या पार्श्वभूमीवर बारामती पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरली असून, सर्व पक्षांच्या रणनीतीवर लक्ष ठेवले जात आहे.

Published on: Apr 06, 2026 12:37 PM
Follow Us