Baramati Election 2026 | रोहित पवारांचा बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न यशस्वी होणार? काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चांना वेग
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून काँग्रेसने आकाश मोरे यांना रिंगणात उतरवल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन पक्षाने उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून काँग्रेसने आकाश मोरे यांना रिंगणात उतरवल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन पक्षाने उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केली. यावेळी व्हिडिओ कॉलद्वारे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशीही चर्चा करण्यात आली. बंद दाराआड झालेल्या या बैठकीत रोहित पवार यांनी भावनिक आवाहन करत म्हटले की, “अजित दादांसारखा मोठा नेता गेल्यानंतर त्यांना खरी श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक भावनिक पातळीवर पाहणे गरजेचे आहे.”
यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतरही अपेक्षित गतीने तपास होत नसल्याबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. “इतक्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत योग्य ती कारवाई होत नसेल, तर सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार?” असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवार दिल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस हा स्वतंत्र विचारसरणीचा पक्ष असल्याचे नमूद करत रोहित पवार यांनी सांगितले की, “त्यांची भूमिका ठाम असली तरी मी कुटुंबातील सदस्य आणि कार्यकर्ता म्हणून त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे.” बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून, काँग्रेसमध्येही या संदर्भात अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची लढत रंगणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Apr 09, 2026 10:48 AM
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली

