AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Ahir | खासदारकी वाचवण्यासाठी बारणे शिंदे गटात, सचिन अहिर यांची टीका

Sachin Ahir | खासदारकी वाचवण्यासाठी बारणे शिंदे गटात, सचिन अहिर यांची टीका

| Updated on: Jul 24, 2022 | 5:07 PM
Share

Sachin Ahir | खासदारकी वाचवण्यासाठी आणि आमदारकी वाचवण्यासाठीच अनेक जण शिंदे गटात गेल्याचा टोला सचिन अहिर यांनी लगावला.

Sachin Ahir | आमदारकी वाचवण्यासाठी अनेकांनी शिंदे गटात (Eknath Shine Group) प्रवेश केला. तसेच खासदारकी वाचवण्यासाठी श्रीरंग बारणे (Srirang Barane) यांनी शिंदे गट जवळचा केला असा टोला शिवसेना आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी लगावला. आज रविवारी पुण्यात शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर हल्ला केला. भाजपचा झंझावत असताना आणि संघर्षाच्या काळात बारणे आणि शिंदे गटातील इतर जणांना उद्धव ठाकरे (Udhav Thackery) यांनी उमेदवारी दिली. निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. ठाकरे यांनी आजारपणाशी चार हात करत जनतेची सेवा केली. अशावेळी शिवसैनिकांनी, आमदार, खासदारांनी त्यांच्य़ा पाठिशी राहणे आवश्यक होते. बारणे हे खरेतरी बोलले, खासदारकी शाबूत ठेवण्यासाठी शिंदे गटासोबत जात असल्याचं त्यांनी सांगितले, इतर जणं सांगत नसले तरी खासदारकी (MP) वाचवण्यासाठीचे ते शिंदे गटात गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Published on: Jul 24, 2022 05:04 PM