भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक… नेमकं काय घडतंय?
या वर्षातील सर्वात धोकादायक ठरलेल्या 'बावी' चक्रीवादळाबाबत अनेक चर्चा होत होत्या. या चक्रीवादळाचं स्वरुप अत्यांत भयंकर असून कोणत्याही देशाला याचा खूप मोठा नुकसान होईल असं सांगितलं जात होतं. या वादळाने आता चीनच्या सीमेलगतच्या भागांवर धडक दिली आहे. या चक्रीवादळाने चीन आणि तैवानमध्ये मोठे नुकसान केले आहे.
या वर्षातील सर्वात धोकादायक ठरलेल्या ‘बावी’ चक्रीवादळाबाबत अनेक चर्चा होत होत्या. या चक्रीवादळाचं स्वरुप अत्यांत भयंकर असून कोणत्याही देशाला याचा खूप मोठा नुकसान होईल असं सांगितलं जात होतं. या वादळाने आता चीनच्या सीमेलगतच्या भागांवर धडक दिली आहे. या चक्रीवादळाने चीन आणि तैवानमध्ये मोठे नुकसान केले आहे. शनिवारी रात्री हे वादळ 144 किमी प्रतितास वेगाने चीनच्या पूर्वेकडील झेजियांग प्रांतात धडकलं. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
धोका लक्षात घेऊन चीन प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे स्थलांतर केले. झेजियांग प्रांतातून 17 लाख, शांघायमधून 34 हजार आणि फुझियान प्रांतातून 1 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. एकूण 20 लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
दरम्यान, 650 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून शाळा, महाविद्यालये आणि हाय-स्पीड रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी भारतातूनही अनेक विमान चीनला जात आणि येत असतात त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर 650 हुन अधिक विमान उड्डाण रद्द करण्यात आल्या आहेत.
चीनमध्ये पोहोचण्यापूर्वी हे वादळ तैवानच्या उत्तर किनारपट्टीवरून गेले होते. तेथे मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे झाडे आणि वीजखांब कोसळले. या घटनांमध्ये किमान 134 नागरिक जखमी झाले आहेत.
Published on: Jul 12, 2026 03:39 PM
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा
मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
'मातोश्री'बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलता

