सह्याद्रीच्या डोंगररांगा, वळणदार रस्ता अन् गगनबावडाचं पावसाळ्यात खुललेलं सौंदर्य, बघा ड्रोन शॉट
सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगरातून जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यांची सर्वच पर्यटकांना नेहमीच भुरळ पडते. कणकवली ते कोल्हापूरला जोडणाऱ्या गगनबावडा म्हणजेच भूईबावडा घाटांचे विलोभनीय दृश्य खास टिव्ही 9 च्या प्रेक्षकांसाठी ड्रोनच्या माध्यमातून तन्मय दाते यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
पावसाळ्यात नेहमीच कोकणाचं सौंदर्य हे खुलल्याचे पाहायला मिळते. यंदाही कोकण हिरवळीने नटलेलं आहे. कणकवली ते कोल्हापूरला जोडणाऱ्या गगनबावडाची विहंगम दृश्य समोर आली आहे. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगरातून जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यांची सर्वच पर्यटकांना नेहमीच भुरळ पडते. कणकवली ते कोल्हापूरला जोडणाऱ्या गगनबावडा म्हणजेच भूईबावडा घाटांचे विलोभनीय दृश्य खास टिव्ही 9 च्या प्रेक्षकांसाठी ड्रोनच्या माध्यमातून तन्मय दाते यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. हा संपूर्ण घाट सिंधुदुर्गच्या वैभववाडी तहसीलच्या प्रशासनात येतो. हा घाट पावसाळ्यात अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असतो. हा घाट वैभववाडीच्या आधी संपतो आणि राज्य महामार्ग तळेरे गावात (NH 17) संपतो. भुईबावडा घाट नावाचा दुसरा घाट गगनबावडा बसस्थानकापासून उजव्या वळणावर सुरू होतो. याच घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर

