AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kashmir Files चे दिग्दर्शक Vivek Agnihotri यांना 'Y' दर्जाची सुरक्षा

Kashmir Files चे दिग्दर्शक Vivek Agnihotri यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा

| Updated on: Mar 18, 2022 | 1:52 PM
Share

द काश्मीर फाइल्सचे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना Y-दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

द काश्मीर फाइल्सचे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना Y-दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. सीआरपीएफची सुरक्षा त्यांच्यासोबत असेल. ‘द काश्मीर फाईल्स’च्या प्रदर्शनानंतर इंटेलिजन्स ब्युरोच्या थ्रेट परसेप्शन रिपोर्टच्या आधारावर गृहमंत्रालयने विवेक यांना ही सुरक्षा दिली आहे. ते भारतात कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत CRPF चे जवान असतील. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठवडाभरातच 97.30 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटावरून दोन गट तयार झाले आहेत. एक गट या चित्रपटाचं समर्थन करतोय तर दुसरा गट या चित्रपटाविरोधात आहे.