Beed Crime : दोघी जिवलग अन् दोघींचा एकच बॉयफ्रेंड… वाद अन् राग अनावर, मैत्रिणीनंच मैत्रिणीला संपवलं, मृतदेह भरला बॅगेत अन्…
बीडमध्ये बॉयफ्रेंडवरून महिलेने स्वतःच्या मैत्रिणीची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह एका बॉक्समध्ये घेऊन जातानाच सीसीटीव्ही फुटेज समोर आले. मृत महिला ही होमगार्ड पदावर होती.
बीडमध्ये एका मैत्रिणीने आपल्याच मैत्रिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन्ही मैत्रिणींचा एकच बॉयफ्रेंड होता. त्यातून एकीने दुसरीची हत्या केली. विशेष म्हणजे या दोन्ही मैत्रिणी विवाहित होत्या. ज्या महिलेची हत्या झाली ती महिला होमगार्ड होती. आरोपी वृंदावनी फरताळेने होमगार्ड मैत्रिणीला घरी बोलावून घेतलं. घरामध्ये दोन्ही मैत्रिणींचा बॉयफ्रेंडवरून वाद झाला. वादानंतर वृंदावनी फरताळेने होमगार्ड महिलेची मुलाच्या मदतीने हत्या केली. हत्येनंतर मृतदेह एका बॉक्समध्ये घेऊन जातानाच सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. यासाठी शेजारी राहणाऱ्या महिलेची दुचाकी वापरण्यात आली. इतर साहित्य न्यायचं आहे असं सांगून ती दुचाकी घेण्यात आली. त्याच दुचाकीवरून मृतदेह उमरद जहांगीर परिसरात फेकून देण्यात आला. पोलिसांनी महिला आरोपीला घटनास्थळी तापासणी केली आहे. या प्रकरणात आरोपीला काय शिक्षा होतं हे पाहणं महत्वाचं असेल.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार

