Walmik Karad News : कराडला जेलमध्ये मिळतं चिकन, फरसाण; जेलर मुलाणींची तडकाफडकी बदली
Beed jailer transfer : आरोपी वाल्मिक कराड याला विशेष सुविधा पुरवल्याचा आरोप असलेले बीडचे जेलर मुलाणी यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे.
बीड कारागृहाचे जेलर बक्सर मुलाणी यांची बीडहून लातूरला तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराड याला बीड कारागृहात ठेवण्यात आलेलं आहे. मतर या ठिकाणी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सातत्याने होतं आहे. विरोधकांबरोबरच अंदर सुरेश धस, अंजली दमानिया आणि याच प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्याकडून अशा प्रकारचे आरोप सातत्याने केले जात आहे. खुद्द पोलीस प्रशासनाकडूनच वाल्मिक कराड याला कारागृहात विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याचं बोललं जात आहे. कराड याला कारागृहात बुधवारी आणि शुक्रवारी मांसाहारी जेवण दिलं जातं. फरसाण आणि इतर व्हीआयपी सुविधा देखील पुरवल्या जातात असा आरोप नुकताच रणजित कासले याने केला होता. त्यानंतर बीडचे जेलर बक्सर मुलाणी यांची तडकाफडकी लातूरला बदली करण्यात आली आहे. त्यानंतर बीड कारागृहात राजाराम चांदणे हे नवे जेलर म्हणून आले आहेत.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक

