बाळांनो… माझी शपथ आता तुम्हाला; पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पकंजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे हे लोकसभेच्या रिंगणात उतरले. निकालाच्या दिवशी या दोघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली मात्र अखेरच्या टप्प्यात बजरंग सोनावणे हे पंकजा मुंडे यांच्यावर भारी पडले
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवानंतर बीड जिल्ह्यातील आणखी एका कायकर्त्यांनं स्वतःचं जीवन संपवल्याचे समोर आले आहे. पकंजा मुंडे यांच्या पराभवानंतर एकानं टोकाचं पाऊल उचललं असल्याचा दावा बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाकडून करण्यात आला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पकंजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे हे लोकसभेच्या रिंगणात उतरले. निकालाच्या दिवशी या दोघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली मात्र अखेरच्या टप्प्यात बजरंग सोनावणे हे पंकजा मुंडे यांच्यावर भारी पडले आणि त्यांचा विजय झाला. दरम्यान, लोकसभेतील पराभवानंतर कार्यकर्ते नाराज असून आष्टीतील चिंचेवाडीमधील पोपट वायबसे नावाच्या व्यक्तिने स्वतःचे जीवन संपवले आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका

