Sandeep Kshirsagar : धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच – संदीप क्षीरसागर
Sandeep Kshirsagar Viral Audio Clip : संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरल्याने मला टार्गेट केलं जात आहे, असं बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हंटलं आहे. व्हायरल झालेल्या धमकीच्या ऑडिओ क्लिपवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरल्याने मला टार्गेट केलं जात आहे, असं बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हंटलं आहे. अधिकाऱ्यानी बीडच्या अनेक जमिनीच्या प्रकरणात बदमाशी केली आहे. ऑडिओ क्लिप मधला आवाज माझाच आहे, असंही क्षीरसागर यांनी म्हंटलं आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून नायब तहसीलदारांना ते फोनवरुन धमकी देत असल्याचं ऐकायला मिळत आहे. आता, आमदार क्षीरसागर यांनी या व्हायरल क्लिपवर आपली प्रतिक्रिया दिली असून ही क्लिप दीड वर्षांपूर्वीची आहे. त्यावर क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो आवाज माझाच आहे. अशा बादमाश अधिकाऱ्याची आरती केली पाहिजे का? असा उलट प्रश्न त्यांनी केला आहे. आपल्या पदाचा हा अधिकारी दुरुपयोग करतो. माझ्याकडे पुरावे आहेत. मात्र आता संतोष देशमुख हत्या प्रकरण मी उचलून धरल्याने मला टार्गेट केलं जात असल्याचं यावेळी संदीप क्षीरसागर यांनी म्हंटलं आहे.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
