Beed SP Navneet Kanwat Video : बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण… बीड पोलिसांचा मोठा निर्णय चर्चेत
बीडमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे साामाजिक सलोखा बिघडला आहे. याच कारणामुळे आता बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख असल्याचे पाहायला मिळणार आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून साामाजिक सलोखा देखील बिघडू लागला असल्याकारणाने पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख असणार असून वर्दीवरील नेमप्लेटवर आता आडनावाचा उल्लेख नसणार आहे. बीडमध्ये पोलिस अधीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्याच टेबलांवरील आणि छातीवरील नेमप्लेटमधून आडनाव हटवले जाणार आहे. दरम्यान, नवनीत कॉवत यांनी पोलिसांनी एकमेकांना आडनावाने नाहीतर केवळ नावानेच हाक मारावी, असे सांगितले होते. यानंतर त्यांनी पोलिसांच्या नेमप्लेटवरील आडनावंही हटवली होती. यानंतर आता बीड पोलिसांच्या नेमप्लेटसह टेबलावरही फक्त त्यांची नावे आणि पदं नमूद करण्यात आली आहेत. यामुळे बीड पोलिसांचे कौतुक होत आहे.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
