Beed News : धक्कादायक! बीड पुन्हा चर्चेत, 800 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या
ऊसतोड कामगारांच्या सततच्या राजकारणावरून चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहे.
ऊसतोड कामगारांवरून प्रत्येक निवडणुकीत राजकारण होत असतं. त्यांच्या समस्या आणि प्रश्नांवरून मोठे मोठे वायदे देखील केले जातात. मात्र आता बीडमधल्या 843 ऊसतोड महिलांची गर्भपिशवी काढण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऊसतोड मंजूर आणि ऊसतोड मंजुरांच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या बीडमध्ये पुन्हा एकदा 843 महिलांची गर्भपिशवी काढली असल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे वारंवार अशा घटना घडूनही स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गोष्टीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आता ही घटना समोर आल्यानंतर समिती नेमू, चौकशी अहवाल मागवू अशी उत्तरं प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
यावर यशोमती ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित करत या ठिकाणी असं काय होतं की इतक्या मोठ्या संख्येने महिलांचे गर्भाशय काढून टाकले जातात? असा प्रश्न उपस्थित केला आहे. 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या जातात आणि महिला आयोग काय झोपले आहे का? असे संतप्त सवाल ठाकूर यांनी उपस्थित केले आहेत.
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...

