Beed Crime News : बीड दहशतमुक्त होणार? मकोका आणि एमपीडीएच्या 17 मोठ्या कारवाया
Beed district anti-crime drive : बीडच्या वाढत्या गुन्हेगारीवर आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ठोस पाऊल उचलत कारवाया सुरू केल्या आहेत.
बीड दहशतमुक्त करण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी विशेष मोहीम राबवली आहे. जिल्ह्यातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी 17 मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. 5 महिन्यात मकोका आणि एमपीडीएच्या 17 मोठ्या कारवाया बीडच्या पोलीस अधिक्षकांनी केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत बीडची ओळख ही गुन्हेगारीचा अड्डा अशी झाली आहे. सतत सुरू असलेल्या समाजविघातक घटनांनी बीडची नकारात्मक प्रतिमा राज्यात पसरली आहे. त्यामुळे बीड पोलिसांच्या कार्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. असं असतानाच आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्हा दहशतमुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. कावत यांनी कारवायांचा धडाका सुरू केला आहे. मकोका आणि एमपीडीएच्या 17 मोठ्या कारवाया करत 12 गुंडांवर कारवाई करण्यात आली आहे.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग

