Beed Murder Case Video : गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरातमध्ये तर वाल्मिक कराड…
धक्कादायक म्हणजे संतोष देशमुख हत्येमधला अद्यापही फरार असलेला आरोपी सुद्धा नाशिकच्या मुक्तीधाम मंदिर परिसरामध्ये फिरत असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केलेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील जवळपास सर्वच आरोपींनी फरार झाल्यानंतर विविध देवस्थानांचा आश्रय घेतल्याचे समोर आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित आरोपी फरार झाल्यावर अनेक देवस्थानांच्या आश्रयाला राहिले का? गर्दीचा फायदा घेत त्यांनी लपण्यासाठी देवस्थानच निवडली का? असा प्रश्न आता समोर येतो आहे. त्यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. माहितीनुसार हत्येनंतर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे रेल्वेने गुजरातला गेले. तिथल्या एका मंदिरात त्यांनी जवळपास पंधरा दिवस आश्रय घेतला. तर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे देखील बीडमधून फरार झाल्यानंतर नाशिकमधल्या दिंडोरी इथल्या स्वामी समर्थ आश्रमामध्ये गेल्याचे समोर आले. धक्कादायक म्हणजे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी फरार झाल्यानंतर कायम गर्दीच्या ठिकाणी राहता यावे म्हणून देवस्थानांचा आश्रय घेतला होता. गुन्हा दाखल झाला त्यावेळी कराड मध्यप्रदेशच्या उज्जैनला होता. त्याच्यासोबत महाराष्ट्र सरकारने दिलेले दोन गार्ड देखील होते. पण त्यानंतर अचानक हे गार्ड परतले आणि कराड फरार झाला. बीडमधून कराडने दिंडोरीमधल्या स्वामी समर्थांचा आश्रम गाठला. यानंतर त्याच्या एका समर्थकाच्या दाव्यानूसार सरेंडरच्या आधी तो अक्कलकोटमधल्या स्वामी समर्थ मंदिरातून पुण्यामध्ये पोहोचला.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

