Walmik Karad VIDEO : 'आका सोपा नाही...', सरपंच हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?

Walmik Karad VIDEO : ‘आका सोपा नाही…’, सरपंच हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?

| Updated on: Jan 17, 2025 | 11:12 AM

वाल्मिक कराडच्या चौकशीदरम्यान त्याच्याकडील तीन मोबाईल जप्त करण्यात आले. त्यापैकी काही सीम कार्ड अमेरिकेत नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत आणि त्या आधीच्या निवडणुकीच्या काळात याच सीमचा वापर करून अनेकांना फोन केल्याचा एसआयटीला संशय

बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी आणि खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडचं थेट अमेरिका कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. तपासामध्ये वाल्मिक कराडकडून जी सीम कार्ड जप्त कऱण्यात आली आहे त्यातील काही कार्ड अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती मिळतेय. सूत्रांच्या माहितीनुसार, वाल्मिक कराडच्या चौकशीदरम्यान त्याच्याकडील तीन मोबाईल जप्त करण्यात आले. त्यापैकी काही सीम कार्ड अमेरिकेत नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत आणि त्या आधीच्या निवडणुकीच्या काळात याच सीमचा वापर करून अनेकांना फोन केले गेले असल्याचा संशय एसआयटीने व्यक्त केलाय. त्यामुळे कराड अमेरिकेतील सीमकार्ड का वापरत होता याचा उलगडा होणं गरजेचं आहे. तर यापूर्वी अदानी-अंबानी वापरत नसतील तितके फोन वाल्मिक कराड वापरत असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. दरम्यान, कराडची पत्नी मंजिरी कराड यांनी आपल्या पतीला टार्गेट केलं जातंय , असं म्हटलंय. त्यामागे प्रामुख्याने सुरेश धस असल्याचे त्यांनी म्हटलंय. बघा वाल्मिक कराडच्या पत्नीने काय केला सुरेश धसांवर हल्लाबोल?

Published on: Jan 17, 2025 11:12 AM