लोकसभा निवडणुकांपूर्वी दोन नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, कोण आहेत दोघे नवे आयुक्त?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीकडून आज दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू (बलविंदर संधू ) यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली, १४ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकीपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीकडून आज दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू (बलविंदर संधू ) यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची नावे समितीने निश्चित केली आहे. आता ही नावे राष्ट्रपतीकडे जातील. त्यानंतर राष्ट्रपती या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले. केरळमधील ज्ञानेश कुमार आहेत तर सुखबीर संधू हे पंजाबमधील आहे. सुखविंदर संधू हे उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि NHAI चे चेअरमन राहिले आहेत. ज्ञानेशकुमार १९८८ बॅचचे केरळचे आयएएस अधिकारी आहेत.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

