AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagwat Karad on Vinayak Mete | विनायक मेटे यांच्या जाण्याने राज्याची हानी, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केल्या भावना

Bhagwat Karad on Vinayak Mete | विनायक मेटे यांच्या जाण्याने राज्याची हानी, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केल्या भावना

| Updated on: Aug 14, 2022 | 5:09 PM
Share

Bhagwat Karad on Vinayak Mete | विनायक मेटे यांच्या जाण्याने राज्याची हानी झाल्याचे भागवत कराड यांनी भावना व्यक्त केल्या.

Bhagwat Karad on Vinayak Mete | विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या जाण्याने राज्याची हानी झाल्याच्या भावना केद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad )यांनी व्यक्त केल्या. त्यांची शिवसंग्राम संघटना (Shivsangram Sanghatna) भाजप युतीतील घटक पक्ष आहे. ते झुंजार नेते होते. त्यांच्यासोबत फार जुना ऋणानुबंध असल्याचे त्यांनी सांगितले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांना सर्वप्रथम आमदार केल्याची आठवण कराड यांनी यावेळी ताजी केली. तसेच ते भाजपसोडून राष्ट्रवादीसोबत गेले. त्यानंतर पु्न्हा मुंडे यांच्या आग्रहाखातर ते भाजपसोबत आले आणि 2014 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढल्याची माहिती यावेळी कराड यांनी दिली. रविवारी पहाटे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मेटे यांच्या गाडीला बोगद्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात मेटे यांचे निधन झाले.

Published on: Aug 14, 2022 05:09 PM